पुरंदर l पंढरपूर येथे भिवरीकर उभारणार दोन कोटी रुपयांचे भव्य वारकरी भवन : भूमिपूजन संपन्न

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टिम-----
पुरंदर : प्रतिनिधी 
भिवरी (ता. पुरंदर) येथील चतुर्मुख भैरवनाथ पंचक्रोशी प्रासादिक दिंडी सोहळ्याच्या वतीने पंढरपूर येथे  दोन कोटी रुपयांच्या वारकरी भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. 
     भिवरी येथील ग्रामस्थांनी सामुदायिक वर्गणीतून वारकरी भवनासाठी एक वर्षांपूर्वी एक कोटी रुपयाची सहा गुंठे जमीन खरेदी केली होती. बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी पंढरपूर येथे भिवरी पंचक्रोशीतील मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन कोटी रुपयांच्या वारकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
    भिवरी (ता.पुरंदर) येथील  सर्व निवडणुका गेल्या २५ वर्षापासून बिनविरोध होत आहेत. त्यामुळे गावात शांतता प्रस्थापित होऊन एकीची भावना तयार झाली आहे.विविध विकास कामाच्या माध्यमांतून भिवरी पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास झालेला आहे. या परिसरातील वारकऱ्यांनी एकत्र येत ग्रामस्थांच्या मदतीने चतुर्मुख भैरवनाथ पंचक्रोशी प्रासादिक  दिंडी सोहळ्याची स्थापना केली. संत सोपानकाकांच्या पालखीसोबत हा दिंडी सोहळा पंढरपूर येथे वारी कालावधीत विसावतो. तेथे या दिंडीतील वारकऱ्यांना निवास प्रसंगी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे. यावर उपाय म्हणून सर्व भिवरीकर ग्रामस्थांनी एकत्र येत सामुदायिक वर्गणीतून वारकरी भवन बांधण्याचा निर्णय घेतला. 
    भूमीपूजन कार्यक्रमाचे नियोजन  चतुर्मुख भैरवनाथ पंचक्रोशी प्रासादिक दिंडी सोहळा अध्यक्ष संभाजी नाटकर, उपाध्यक्ष नाथाभाऊ कटके, सचिव माऊली घारे, कार्याध्यक्ष जगन्नाथ कटके, खजिनदार मारुती कटके व संचालक मंडळ यांनी केले.
       भूमिपूजन प्रसंगी  नगरसेवक डी राज सर्वगोड, उद्योजक प्रमोद कचरे, सरपंच मोनाली कटके, गोसावीबुवा तरुण मंडळ अध्यक्ष सागर कटके, वीर नेताजी मंडळ अध्यक्ष भाऊसाहेब दळवी, भैरवनाथ सेवा मंडळ अध्यक्ष उत्तम कटके, चेअरमन म्हस्कु कटके, पोलीस पाटील सचिन दळवी आदीसह भिवरी पंचक्रोशीतील विविध संस्था, पक्ष, मंडळ,संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
    वारकरी भवन भूमिपूजनाचे पौराहित्य अरुण अत्रे यांनी केले.
     सर्व सोयींनी युक्त असे वारकरी भवन उभारण्यासाठी सर्व भिवरीकर ग्रामस्थांची व विविध क्षेत्रातील दानशूर लोकांची मदत घेणार असल्याचे चतुर्मुख भैरवनाथ पंचक्रोशी प्रसादिक दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष संभाजी नाटकर यांनी सांगितले.
To Top