सुपे परगणा l सुप्यात बाजरीच्या पाच हजार पोत्यांची विक्रमी आवक : उत्पादन खर्च पाहता..मिळणारा दर परवडणारा का ?

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील उपबाजार समितीच्या आवारामध्ये बाजरीच्या सुमारे साडेचार ते पाच हजार पोत्यांची उच्चांकी आवक झाली. मात्र पिकांना होणारा उत्पादन खर्च पाहता मिळणारा दर परवडत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्यातून उमटत आहेत. 
       बुधवारी ( दि. १५ ) येथील उपबाजारात बाजरीला प्रति क्विंटल किमान २२०० ते कमाल ३३०० तर सरासरी २७५१ रुपये दर मिळाला. यावेळी बाजारात प्रथमच ऐवढी बाजरीची आवक झाल्याने दोन दिवस लिलाव सुरु होते. तर गुरुवारी संध्याकाळी उशीरापर्यंत लिलाव सुरु होते. 
   तर इतर धान्याला मिळालेले बाजार भाव पुढील प्रमाणे - ज्वारी २७०० ते ३४००, गहू २५०० ते ३०००, मका १८०० ते २९५०, हरभरा ४७५१ ते ५६३०, उडीद ४५०० ते ५३९०, सोयाबीन -३८०० ते ४१५१, सुर्यफुल ४९०० ते ५३०० असा बाजारभाव मिळाला.
     बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुपे येथील उपबाजारामध्ये बारामती तालुक्यासह, दौंड, शिरूर आणि पुरंदर आदी ठिकाणावरून शेतकरी बाजरी विक्रीसाठी आणतात. 
          यावर्षी समाधानकारक पाऊस आणि पोषक हवामानामुळे बाजरीचे उत्पादन वाढले आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना चांगले दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे आणि उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली. 
     शेतकऱ्यांनी शेतमाल स्वच्छ आणि वाळवून आणण्याचे आवाहन केले आहे. यामुळे शेतमालाला आणखी चांगला दर मिळू शकतो अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.      
      येथील मागिल आठवड्यापासुन बाजरीची आवक वाढली आहे. सद्या दिवाळीचा सण असल्याने शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत आहे. त्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याची माहिती येथील आडत व्यापारी सुभाष चांदगुडे यांनी दिली. 
             .......................................


To Top