सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोपगाव या शाळेतील हर्षवर्धन चेतन राठोड या विद्यार्थ्याला इस्रो या संस्थेस भेट देण्याची संधी मिळाली आहे.
जिल्हा परिषद पुणे अंतर्गत इस्रो आणि नासा या अंतराळ संशोधन संस्थांना भेट देणे हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन टप्प्यात चाचणी परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक लेखी परीक्षा दुसरी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. १६००० विद्यार्थ्यांमधून २३५ विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले होते. या विद्यार्थ्यांची दि. ६ ते ८ ऑगस्ट या दरम्यान आयुका या संस्थेमध्ये मुलाखत घेण्यात आली. त्यामध्ये बोपगाव शाळेचा विद्यार्थी पात्र झाला असून त्याला इस्रो या संस्थेला भेट देण्याची संधी मिळाली आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी निरा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती संदीप फडतरे ,माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश फडतरे, सरपंच सारिका कृष्णा गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनबा फडतरे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका .सुजाता पवार , शिक्षक.शुभांगी धुमाळ .ज्योती जगताप, सारिका जगताप, वैशाली शिंदे व रेणुका शेंडकर या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
यास पुरंदर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे , विस्तार अधिकारी राजेंद्र कुंजीर ,केंद्रप्रमुख प्रताप मेमाणे, विषय तज्ञ भरत जगदाळे व बापूसाहेब शिरसाट यांनी त्याच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.