सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
मेढा नगर पंचायत स्थापने नंतर दुसऱ्यांदा होवु घातलेल्या निवडणूकीसाठी सतरा प्रभागामध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग तसेच खुल्या जागेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत शांततेत संपन्न झाली.
मेढा येथिल पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता मेढा नगर पंचायतसाठी सतरा प्रभाग आरक्षण सोडतीस सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांची प्रमुख उपस्थिती सह मुख्याधिकारी अजिंक्य पाटील उपस्थित होते.
मेढा नगरपंचायतीच्या १७ जागेसाठी प्रभाग आरक्षण सोडत ही सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे करण्यात येवुन अनुसचित जाती व जमाती जादा असलेल्या प्रभागांना प्रथमता आरक्षित करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक एक व दोन हा अनुसूचित जाती साठी तर प्रभाग क्रमांक तीन हा अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आल्याने शिल्लक चार ते सतरा प्रभागामध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग सोडत घेण्यात आली.
प्रभाग क्रमांक चार ते सतरा पैकी प्रभाग क्रमांक सहा, दहा , तेरा,चौदा, आणि सोळा हे नागरिकांचा मागासवर्ग प्रभागासाठी आरक्षित करण्यात आले तर प्रभाग चार, पाच, सात, आठ , नऊ, अकरा, बारा , पंधरा आणि सतरा हे खुल्या गटासाठी आरक्षित करण्यात आले.
नगरपंचायतीच्या सतरा प्रभागासाठी आरक्षण सोडती मध्ये १७ पैकी ९ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे - प्रभाग क्रमांक दोन अनुसुचित जाती, प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जमाती, प्रभाग क्रमांक सहा , चौदा व सोळा हा नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि प्रभाग क्रमांक चार, पाच , आठ आणि पंधरा हा सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित करण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी घोषीत केले.
यावेळी सिया जवळ, अर्णव जवळ आणि वंश जवळ या मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. सोडती दरम्यान नगरीचे माजी नगराध्यक्ष , माजी नगरसेवक , विविध पक्षाचे पदाधिकारी मेठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपंचायत प्रभाग आरक्षण सोडत शांततेत संपन्न होत असताना सपोनि सुधिर पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मेढा नगरपंचायतीच्या वतीने अधिक्षिका हिमाली कुलकर्णी, अक्षय चन्ने, अभियंता राऊत, स्वच्छता निरीक्षक स्वरूप अहिवळे, अभियंता अभिजित ढाणक, समन्वयक स्वप्नील देशमुख, लिपीक विकास जवळ, सचिन करंजेकर, आशिष कुंभार , संजय जवळ, शुभंम जवळ, राजु पुजारी आदींनी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले.