सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील मार्गासनी येथील पोलीस पाटील वैभव निवृत्ती वालगुडे यांची पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या संघटक पदी व जिल्हा सरचिटणीस पदी शिवाजी राऊत यांची निवड झाली आहे. दौंड येथील कार्यक्रमांमध्ये मार्गासनी गावचे पोलीस पाटील वैभव निवृत्ती वालगुडे यांना पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या संघटक पदी नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्तीपत्र दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल व महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश शेंडगे, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष दिपाली तळेकर राजगड तालुका विष्णू निगडे किरण चोरघे जितेंद्र मुजुमले प्रियंका पासलकर महिला जिल्हा संघटक शर्मिला कारले अमोल नलावडे संजय कडू रेणुका खोपडे आदीसह पोलीस पाटील उपस्थित होते.
