सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
सोनोरी (ता.पुरंदर) येथील मल्हारगड किल्ल्यावर दिवाळी पाडव्यानिमित्ताने १५१ मशाली पेटविण्यात आल्या.
अनेक वर्षापासून दिवाळी पाडव्यानिमित्त सोनोरीचा मल्हारगड या किल्ल्यावर मल्हारगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीश शिंदे हे या कार्यक्रमाचे नियोजन करतात.
दरवर्षीप्रमाणे महादेव मंदिर खंडोबा मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पूजा करून रांगोळ्या काढून व फुलांची सजावट करून तसेच गडाचा महादरवाजा या ठिकाणी तोरण बांधून साजरा केला. त्याचप्रमाणे यावर्षी १५१मशाली गडाच्या तटबंदी वरती लावून पेटविल्या . गडावर पणत्या लावल्या.तसेच गडावर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
यावर्षी अनेक गडप्रेमी हजर होते. हा सर्व कार्यक्रम पहाटे चार वाजता करण्यात आला. यावेळी विजय शिंदे, विकास शिंदे,निलेश शिंदे ,हिमेश शिंदे , सुनील काळे,विशाल वायकर, कुंजीरवाडीचे शिवप्रेमी उपस्थित होते.
श्रेयस शिंदे या लहान मुलाने शिवाजी महाराजांची गारद दिली. जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या.
