सुपे परगणा l काळखैरेवाडीच्या उपसरपंचपदी प्रशांत खैरे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दीपक जाधव 
बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रशांत मंगेश खैरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
       यापूर्वीचे उपसरपंच अजित काळखैरे यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते. येथील सरपंच नम्रता कुतवळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उपसरपंचपदाच्या निवडीची बैठक झाली. यामध्ये प्रशांत खैरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ग्रामसेवक आर. डी. ननवरे यांनी काम पाहिले. 
      यावेळी बाजार समितीचे संचालक विशाल भोंडवे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भोसले, स्वाती भोंडवे, अंकिता भोंडवे, कोमल कुतवळ, संगीता भोंडवे तसेच कुंडलिक काळखैरे, तुषार कुतवळ, वाल्मिक खैरे, अतुल खैरे, सागर चांदगुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 
             _________________________
                      
To Top