सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथे नाथसखा आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च चॅरिटेबल ट्रस्ट ( ता. दौंड ) यांच्यावतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी या शिबिरात १२७ रुग्णांनी सहभागी होऊन मोफत तपासणी व उपचारांचा लाभ देण्यात आला.
सुपे येथील उपबाजार समितिच्या आवारातील गणेश मंदिरामध्ये रोटरी क्लब, स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघ आणि मयुरेश्वर पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यजागरासाठी नाथसखा या शिबिरात गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, वातविकार अशा विविध आजारांवरील आयुर्वेदिक तपासणी व उपचार डॉ. निलेश शेलार व डॉ. पौर्णिमा शेलार यांनी केले.
यावेळी शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांना आयुर्वेदिक उपचारपद्धतीबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशी शिबिरे नियमितपणे आयोजित करावीत, अशी मागणी केली. यावेळी दर महिन्याच्या १५ तारखेला शिबीर घेण्यात येणार असल्याची माहिती सुभाष चांदगुडे यांनी दिली.
याप्रसंगी येथील सरपंच तुषार हिरवे, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चांदगुडे, विद्यमान अध्यक्ष पोपट चिपाडे, सुयश जगताप आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
...................................