Rajgad News l राजगड तालुक्यात भाजप पक्षांतर्गत वाद चिघळला : तालुकाध्यक्षांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
भारतीय जनता पार्टी राजगड तालुका अध्यक्षा विरोधात वेल्हे पोलिसात तक्रार आल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली.
        याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सचिव शुभम बेलदरे यांनी भारतीय जनता पार्टी राजगड तालुका अध्यक्ष राजू रेणुसे यांच्या विरोधात  पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की भारतीय जनता पक्षाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे निरोप शुभम बेलदरे यांना मिळाला नव्हता त्याबाबत भाजपच्या सोशलं मीडियावर चर्चा करताना बेलदरे यांनी ग्रुप वर बैठकीचा निरोप मिळाला नसल्याचा मेसेज पाठवला. याबाबत तालुका अध्यक्ष राजू रेणुसे यांनी दूरध्वनी  शुभम बेलदरे यास दमदाटी व शिवीगाळ केली असल्याची तक्रार बेलदरे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत अधिक तपास वेल्हे पोलीस करीत आहेत.भारतीय जनता पार्टी राजगड तालुका अध्यक्ष राजू रेणुसे यांनी या अगोदर देखील असा प्रकार केला होता अशी माहिती शुभम बेलदरे यांनी दिली.
          तर याबाबत तालुका अध्यक्ष राजू रेणुसे यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी आढावा बैठकीचा निरोप भाजपच्या तालुक्यातील अधिकृत ग्रुप वर बैठकीच्या चार अगोदर मेसेज टाकण्यात आला होता. वैयक्तिक फोन कोणालाही केले नाही.
To Top