Ahilyanagar News l विठ्ठल ठोंबरे l संगमनेर नगरपालिकेची निवडणूक मनसे पक्ष ताकतीनिशी लढणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
अहिल्यानगर : विठ्ठल ठोंबरे
मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संगमनेर येथे मनसेची नुकतीच आढावा बैठक पार पडली. संगमनेर मनसे तालुकाध्यक्ष राहुल पानसरे यांनी या आढावा बैठकीचे नियोजन केले होते. 
           याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे व तालुका अध्यक्ष राहुल पानसरे यांनी संगमनेर नगरपालिकेमध्ये निवडणूक लढण्यासाठी चुका असणाऱ्या सर्व इच्छुकांशी सविस्तर चर्चा केली व येत्या निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी. संगमनेर शहरांमध्ये आपले उमेदवार निवडून आल्यानंतर संगमनेर शहरांमध्ये कशाप्रकारे विकास करणार आहे हे जनतेला पटवून सांगावे तसेच इतर पक्षाकडून युतीचा प्रस्ताव आल्यास 
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे व पक्षाचे इतर नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आपल्या सर्व उमेदवारांनी पूर्ण ताकतीने निवडणूक लढायची पूर्ण तयारी ठेवावी
असे आवाहन याप्रसंगी उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे व तालुकाध्यक्ष राहुल पानसरे यांनी केली.

याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,संगमनेर मनसे तालुकाध्यक्ष राहुल पानसरे, मनसे तालुका संघटक, ऋषिकेश गिरी, अमोल साबणे, विठ्ठल ठोंबरे, नितीन जाधव,जयेश लेंडे,दिपक साळुंखे,गोरख शिंदे,सुयोग ढमाले,अक्षय खर्डे,तेजस पानसरे,सुरज चौधरी,वैभव वाणी,दिग्विजय लावरे,रवि ढमाले,अमोल लावरे,संतोष तापडिया,विनय तापडिया,साई ढमाले,साई शिंदे,ओम शिंदे,ओम ढमाले,सचिन जाधव इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top