सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याचे माजी कामगार संचालक तसेच करंजेपूल गावचे माजी सरपंच बाळासाहेब विठ्ठल गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.
करंजेपुल गावचे सरपंच, करंजे सोसायटीचे चेअरमन, करंजे पतसंस्थेचे चेअरमन तसेच सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कामगार संचालक आशा अनेक पदांचा त्यांनी कार्यभार सांभाळला होता. ते सोमेश्वर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली , दोन भाऊ आसा परिवार आहे.
