सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
’इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’ तर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या फाउंडेशन इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला .
यामधील अंतिम परीक्षेत वाणेवाडी ता . बारामती गावातील वैभवी विजयानंद जगताप ही पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. वाणेवाडी गावातून पहिली महिला सीए होण्याचा मान वैभवी हिने मिळवला आहे. सप्टेंबर मध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेत दोन्ही ग्रुप मधून 16.23% विद्यार्थी उत्तीर्ण झाले .देशभरातून 3663 विद्यार्थी दोन्ही ग्रुपमधून उत्तीर्ण झाले. अत्यंत कमी निकाल हेच या परीक्षेचे ठळक वैशिष्ट्य असते. यूपीएससी , जेईई अँडव्हान्स यानंतर देशातील सर्वात कठीण समजल्या जाणारी परीक्षा म्हणजे सीए परीक्षा . यात अवघ्या 22 व्या वर्षी वैभवी हिने ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन खूप मोठे यश प्राप्त केले आहे.
वैभवी चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण एसएमएस इंग्लिश मीडियम स्कूल कराड येथे झाले. इयत्ता आठवी मध्ये वैभवी हिला राज्यस्तरीय स्कॉलरशिप प्राप्त झाली होती .तसेच एसएससी बोर्ड परीक्षेत 96% गुण मिळाले होते. उच्च माध्यमिक शिक्षण कराड येथील एस जी एम कॉलेज येथे झाले आहे .एचएससी बोर्डात तिला 98 टक्के गुण मिळाले होते . दहावीनंतरच निर्णय घेत सीए करायचे यादृष्टीने पुढील शैक्षणिक वाटचाल करत कराड व पुणे येथे बी कॉम व सीए ची तयारी केली. वैभवी चे वडील विजयानंद गोपूज येथील साखर कारखान्यात नोकरीस असून आई उज्वला या गृहिणी आहेत. समृद्ध शैक्षणिक वारसा हा वैभवी ची आजी वासंतीका मनोहर जगताप , जिल्हा परिषद शाळा निवृत्त मुख्याध्यापिका , काका सचिन जगताप व काकी निता जगताप हे दोघेही माध्यमिक शिक्षक आहेत . या सर्व कुटुंबाचे खंबीर पाठबळ व मार्गदर्शन वैभवी हिस मिळाले. या यशाबद्दल वाणेवाडी गावात साद संवाद स्वच्छता ग्रुपने फटाके व पेढे वाटून आनंद साजरा केला. लवकरच गावामध्ये समस्त ग्रामस्थ वाणेवाडी यांच्यामार्फत भव्य सत्कार आयोजित करण्यात येणार आहे सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम रामराजे जगताप , रामराजे सोसायटी चे माजी चेअरमन चंद्रशेखर जगताप साद संवाद स्वच्छता टीम अध्यक्ष ऍडवोकेट नवनाथ भोसले , टीम समन्वयक डी वाय जगताप यांनी वैभवी चे अभिनंदन केले आहे.
