सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यात नगरपंचायत सह पंचायत समिती व जिल्हापरिषद मध्ये शिवसेनेची सत्ता येण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी तयारी करावी. महायुतीचा निर्णय होईल न होईल परंतु विचार करत बसू नका. गाफील राहु नका नगर पंचायती च्या सतराच्या सतरा जागेवर आपले उमेदवार उभे करा आपला शिवेनेचा भगवा फडकल पाहीजे असे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी केले.
ते मेढा येथिल कलश मंगल कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे, नवीमुंबई संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, शिवउद्योग जिल्हाध्यक्ष संदिप पवार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष श्रीरंग गलगले, प्रशांत तरडे, शांताराम कदम, समीर गोळे संजय सुर्वे, सचिन करंजेकर, सचिन जवळ, सौ . निलम जवळ, सौ. प्रियांका दळवी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी ना. देसाई म्हणाले महायुतीचा विचार करताना शिवसेनेचा अपमान, निंदा, दमदाटी कोणी केली तर शिवसेनेचा स्वाभिमान म्हणुन मी पालकमंत्री तुमच्या पाठीशी आहे. शिवसेनेची ताकद कोणी कमी समजु नये जावलीने पहीला भगवा विधान सभेवर फडकविला आहे. नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष शिवसेने चा होता. त्यावेळी आपली सत्ता नव्हती मंत्री नव्हते पण आता आक्का पालकमंत्री तुमच्या बरोबर आहे असे सांगुन मी जोपर्यत शांत आहे तोपर्यत आहे पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला तर मला पालमंत्रयाच्या भुमिकेत यावे लागेल अला सज्जड इशारा ना. शंभुराज देसाई यांनी दिला.
ना. देसाई पुढे म्हणाले मेढा शहरातील वाढीव घरपट्टीचा प्रश्न चार दिवसात सोडवून जुन्या पद्धत्तीने घरपट्टी आकारणी करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातुन केले जाईल असे आश्वासन देवुन हा वाढीचा निर्णय घेतलाच कसा असा प्रश्न उपस्थित केला. ते पुढे म्हणाले आता कोणीतरी म्हणेल आमच्या मतदार संघात आला अन बोलुन गेला पण शेवटी ही महायुती असली तरी प्रश्न कोण सोडवितो याला उपमुख्यमंत्री महत्व नाही माणसाला अडचणीतुन बाहेर काढला पाहीजे आणि हे काम शिवसेना करेल असेही ना देसाई म्हणाले.
धनुष्य बाण हा महायुतीत आहे. आपणाला महायुतीची सत्ता आणायची आहे महा विकास आघाडीची नाही असे असताना लावलेले बोर्ड काढायला लावणे म्हणजे शिवसेना महायुतीत आहे ना असे सांगत नाराजी व्यक्त केली. यावेळी २४ तास पाणी मिळण्यासाठी आदेश देण्यात येईल असे सांगुन स्मशान भुमीसाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी निधी दिलाय पण तुमची खोडा घालायची पद्धत असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागेल असेही सांगायला ना. शंभूराज देसाई विसरले नाहीत.
यावेळी शिवसेना प्रवक्त्या डॉ ज्योती वाघमारे म्हणाल्या आता कोणत्याही महिलेला आत्महत्या करावी लागणार नाही कारण शिवसेना ही लाडक्या बहीनींचे माहेर आहे. लाडक्या बहीनीबरोबर सुनांच्या रक्षणायी ही जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे असे वचन देवुन एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातुन अनेक योजना आणल्या गेल्याचे डॉ वाघमारे यांनी सांगीतले.
यावेळी संपर्कप्रमुख अंकुश कदम यांनी शिवसैनिकाला कोणी दमदाटी करायचा प्रयत्न करूनये असे सांगुन जावलीच्या विकासाला गती देण्याची विनंती पालक मंत्र्यांना कदम यांनी केली तसेच येथिल तरुणांची होत असलेली दयनिय अवस्थेचा पाढा वाचुन दाखविला.
सचिन करंजेकर यांनी तुमच्या भागात राजकारण करा वसंत गडावरून सभा मारू नका असा सल्ला देवुन बँकेत तुमचीच पोर लावा असे वसंतराव मानकुमरे व ज्ञानदेव रांजणे यांच्यावर टिका केली. शिवसेना शिंदे गटा मध्ये उबटा गटाचे सचिन जवळ यासह अनेकांनी प्रवेश केला. यावेळी नवीमुंबई येथे शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती मिळालेल्या अंकुश कदम यांचा ना. शंभुराज देसाई यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
