सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
सोनवडी सुपे (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीची विद्यार्थीनी कु. ईश्वरी शरद मोरे हिने बालकुमार मराठी साहित्य मंडळ व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या यशानंतर माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने तिचा सत्कार करून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी बारामती दूध संघाचे व्हाईस चेअरमन दत्तात्रेय वावगे, उपसरपंच फत्तेसिंग गोंडगे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे, राष्टवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास काळे, सोनवडी सुपे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र मोरे, दत्तात्रय काळे, हर्षद मोरे, जनार्दन वाबळे, केंद्रप्रमुख शरद मचाले, सुनील पानसरे, अतुल मोरे, पप्पु जराड, शरद मोरे आदींसह शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
नुकतेच वडिलांचे छत्र हरवूनही ईश्वरीने कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभे राहत स्वतःच्या मेहनतीने आणि चिकाटीने हे यश मिळवले. तिच्या दमदार, प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण वक्तृत्वाने परीक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
