Pune News l जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा....! महा-ई-सेवा व आधार केंद्र चालकांचा संप अखेर मागे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणांविरोधात तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ महा-ई-सेवा व आधार केंद्र चालकांनी राज्यव्यापी तीन दिवसांचा संप पुकारला होता.
         आज पुणे जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन केंद्र चालकांच्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. जिल्हाधिकारी डुडी यांनी केंद्र चालकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या असून, उपस्थित मुद्द्यांवर सकारात्मक पद्धतीने विचार करून ते शासनाच्या निदर्शनास तातडीने आणण्याबाबत आश्वासन दिले. त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी योग्य मार्ग काढण्याबाबत सहमती दर्शविली आहे. यावेळी
जिल्हाध्यक्ष विजय मोहिते,जिल्हा सचिव भीमराव आठवले,
राज्य प्रतिनिधी महाधन उघडे, बारामती तालुका अध्यक्ष प्रमोद पानसरे, राज्य संघटक योगेश रांधवण, राज्य निरीक्षक  किशोर अडसूळ,बारामती कोषाध्यक्ष दिनेश पवार
पुणे हवेली अध्यक्ष विशाल कुलकर्णी, दौंड अध्यक्ष किरण काकडे, खेड अध्यक्ष संदीप मेदगे, शिरूर अध्यक्ष  उमाकांत पांडे,पुणे सिटी अध्यक्ष निखिल पालकर, हवेली सचिव सुशील कड,जुन्नर प्रतिनिधी संजय उकिरडे, लोणी काळभोर  राजन गायकवाड, पुरंदर अध्यक्ष मंगेश ढमाल, पुरंदर सचिव  तुषार जगताप, आदी उपस्थित होते. चर्चा समाधानकारक पार पडल्याने, संघटनेतर्फे उद्यापासून संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सर्व महा-ई-सेवा व आधार केंद्रे उद्यापासून नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ववत सुरू राहणार असल्याचे राज्य व जिल्हा कार्यकारिणी यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे.-
To Top