सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
१४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी विद्यालमध्ये बालसभेचे आयोजन इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांनी केले. पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भक्ती काकडे, राजलक्ष्मी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. बालकवी ओजस्वी भोसले, काव्या चव्हाण यांनी अनुक्रमे बालपण आणि चाचा नेहरू या स्वरचित कविता सादर केल्या.शिवानी राजेभोसले हिने 'मी ताराराणी बोलतेय' हा एकपात्री प्रयोग सादर करत प्रेक्षकांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळवला. दिवाळी सुट्टी मध्ये घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सिद्धार्थ सावंत, सार्थक उगले, सार्थक भोसले, श्लोक भोसले, अर्णव जगताप, भक्ती काकडे, ईश्वरी भोसले, शरण्या भोसले, आर्यन भोसले या विद्यार्थ्यांनी पन्हाळा,सिंहगड,लोहगड,तोरणा इ किल्ल्याच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या. प्रास्ताविकात प्राचार्य मानसिंग जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून नेहरूंच्या गोष्टीरूप आठवणी सांगत स्वतंत्र भारताच्या वाटचालीत नेहरूंच्या दूरदृष्टी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे भारत प्रगती करू शकला असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता सहावीतील शिवराज बांदल हा होता. सूत्रसंचालन विद्यार्थिनी संस्कृती चव्हाण व प्रांजल भोसले यांनी केले तर आभार श्रद्धा फरांदे हिने मानले. सुप्रिया तांबे,प्राजक्ता यादव यांनी मार्गदर्शन केले.
