Bhor Breaking l भात कापणीसाठी निघाले होते गावी..! वरंधा घाटात दुचाकी घसरली आणि...

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील माझेरी ता.महाड हद्दीतील वळणावर बुधवार दि.५ सकाळच्या दरम्यान दुचाकीचा अपघात होऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.मृत इसम भोर तालुक्याच्या हिरडस मावळातील शिळींब गावचा असल्याचे समोर आले आहे.
    स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शिळिंब ता.भोर येथील शिवाजी दाजी डेरे (वय - ५०) हे इसम दुचाकीवरून महाडबाजूकडून गावी भात कापणीसाठी येत होते.वरंधा घाटातील माझेरी हद्दीतील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून वळणाच्या वरील रस्त्यावरून दरीच्या बाजूच्या रस्त्यावर ५० वर्षीय इसम पडल्याने डोक्याला जोरदार मार लागला.वळण रस्त्याच्या साईड पट्टीला सुरक्षिततेसाठी दिशादर्शक फलक तसेच बॅरिगेट नसल्याने हा अपघात झाल्याची स्थानिक नागरिकांनी सांगितले.दरम्यान शिवाजी डेरे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांच्या आकस्मित निधनाने हिरडस मावळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.महाड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.
To Top