Baramati News l महावितरण कार्यालयात स्वतंत्र विभाग स्थापन करावा : 'सोमेश्वर'चे संचालक ऋषिकेश गायकवाड यांचे अजितदादांना निवेदन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना होणारे आर्थिक व प्राणहानीचे नुकसान थांबविणे आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी महावितरण कार्यालयातच स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची मागणी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
                शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारांच्या झोळ्यांमुळे व ट्रान्सफॉर्मरच्या स्पार्किंगमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. मेहनतीने उभे केलेली पिके जळून खाक होत असून काही ठिकाणी पाळीव जनावरांचाही जीव गेला आहे. शेतकऱ्यांनी या समस्यांबाबत महावितरण उपविभाग सोमेश्वरनगर येथे निवेदने सादर केली होती मात्र महावितरण कडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे. ऋषिकेश गायकवाड यांनी पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतातून जाणाऱ्या वीज वाहक तारांच्या झोळ्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, पिकांच्या मध्यभागी बसवलेले ट्रान्सफॉर्मर सुरक्षित अंतरावर स्थलांतरित करावेत, 
शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळण्यासाठी महावितरण कार्यालयात स्वतंत्र विभाग स्थापन करावा, 
नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी ठोस यंत्रणा तयार करावी. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि जीवितहानी टाळण्यासाठी शासनस्तरावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.
..........
To Top