Bhor Breaking l कुरुंगवडीत क्रशसॅंडच्या डंपरखाली पाच वर्षीय बालकाचा मृत्यू : तिघे जण जखमी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील कुरुंगवडी येथे शनिवार दि. ८ रोजी दुपारच्यावेळी दुर्दैवी घटनेत डंपर घरावर पलटी झाल्याने एका पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.डंपरखाली तीन व्यक्ती जखमी झाले असून याबाबत धोंडीबा रामभाऊ कचरे (वय २९, रा. कुरुंगवाडी, ता.भोर) यांनी डंपर चालकाविरोधात राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
     पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दुपारी  एमएच १२ केपी २११८ या डंपर मधून चालक अमरजित राजभर हा बेफिकीरपणे क्रशसॅंड डंप करून खाली करत असताना डंपर अचानक उलटून बाजूच्या घरावरील पत्र्याच्या शेडवर कोसळला.या घटनेत घरातील आई आरती,अशोक कचरे (वय ३५), प्रियांका जगन्नाथ कचरे (वय १७), श्लोक अशोक कचरे (वय ६) हे झाले असून तर आलोक अशोक कचरे (वय ५) या लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. तसेच घराचेही मोठे नुकसान झाले आहे.दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून डंपर चालक अमरजीत राजभर याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार औदुंबर अडवाल करत आहेत.
To Top