Bhor News l २१ जागांसाठी १३२ उमेदवारी अर्ज दाखल : नगराध्यक्षपदाला ८ तर नगरसेवक पदासाठी १२४ उमेदवारी अर्ज दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवकांसाठी १२४ अर्ज दाखल करण्यात आलेची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्राजक्ता घोरपडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली. 
           भोर नगरपरिषदेसाठी एक नगराध्यक्ष तर वीस नगरसेवक यांची निवडणूक होणार असून मागील १० नोव्हेंबर पासून नगरपालिका सभागृहात अर्ज स्वीकारले जात होते.मात्र सात दिवसात दहा अर्ज दाखल झाले होते.तर सोमवार दि.१७ रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) गटाने भोर बस स्थानकापासून आमदार शंकर मांडेकर त्यांच्या उपस्थितीत तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी शिवतीर्थ चौपाटी येथून माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेपर्यंत शक्तीप्रदर्शन करीत शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसमवेत गर्दी करीत अर्ज दाखल केले.नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी कडून संजय जगताप,नूतन जगताप,गणेश ज्ञानोबा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामचंद्र (नाना)आवारे, ऋषब रामचंद्र आवारे,शिवसेना शिंदे गट नितीन सोनावले, अपक्ष कविता खोपडे यांनी अर्ज दाखल केले.मंगळवार दि.१८ छाननी प्रक्रिया होणार असून किती अर्ज राहणाऱ्या कडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.यावेळी भाजपा निवडणूक निर्णय अधिकारी प्रभारी राजेंद्र शिळीमकर,जिल्हा उपाध्यक्ष जीवन कोंडे, बाळासाहेब गरुड,माजी सभापती लहूनाना शेलार,रोहन बाठे,माजी जि.प.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,विक्रम खुटवड,चंद्रकांत बाठे,यशवंत डाळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------
भाजपा विरुद्ध महायुती चित्र स्पष्ट 
 भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केल्यानंतर एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ,शिवसेना शिंदे व शिवसेना उद्धव ठाकरे गट असे एकत्र आले असून  महायुती केले गेली.भाजपाला शह देण्यासाठी चार पक्ष एकत्र आले असून भाजपा विरुद्ध महायुती लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.त्यामुळे कोण ताकदीनिशी लढणार आणि नगराध्यक्ष कोणाचा होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
To Top