सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
कायमच दुसऱ्यांवर टीका करण्याचे काम करून ज्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.३५,४० वर्ष आमदार,मंत्री केले त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी साथ सोडून दुसऱ्या पक्षात गेले.सत्ता असताना विकास केला नाही. शहराची वाट लावण्याचे काम केले अशा चुकीच्या प्रवृत्तींना घरी बसवा असे नाव न घेता आमदार शंकर मांडेकर यांनी माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर सडकून टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला साथ द्या भोर शहराचा कायापालट करून दाखवू असे मत व्यक्त केले.
भोर नगर परिषदेच्या प्रचार मेळाव्यादरम्यान राजवाडा चौक येथे आमदार मांडेकर शुक्रवार दि.२१ बोलत होते.नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ भोरचे ग्रामदैवत जानाई देवी मंदिरात श्रीफळ वाढवून जि.प.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,यशवंत डाळ,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामचंद्र आवारे यांनी केला.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप,चंद्रकांत बाठे,विक्रम खुटवड,गणेश निगडे,विठ्ठल शिंदे,नितीन सोनावले,माजी नगराध्यक्षा निर्मला आवारे,कविता खोपडे,केदार देशपांडे,संदीप शेटे,नितीन थोपटे,प्रवीण जगदाळे,अमित जाधव आदींसह नगरसेवक पदाचे उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मांडेकर पुढे बोलताना म्हणाले विरोधकांनी विकासाच्या नावाखाली तालुक्याला लुटून खाल्ले आहे.त्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे नाही. त्यांच्याकडून दुसऱ्याच्या माथी खापर फोडण्याचे काम कायमच केले जाते.विकास करण्याची मानसिकता नसणाऱ्यांना नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालणारी तर फुले- शाहू -आंबेडकर यांच्या विचारांना मानणारी पार्टी आहे.साथ द्या विकास आपोआप होईल.
