Javali News l सोमनाथ साखरे l मेढा नगरपंचायतीच्या कर आकारणीवरून वसंतराव मानकुमरे व अंकूश कदम अमाने-सामने : पत्रकार परिषद घेत एकमेकांवर टिका

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : सोमनाथ साखरे
कर माफ केला असता किंवा जुन्या दराने कर घ्यावा अस पत्र आणल तर तर योग्य होत पण तर न करता स्थगितीचे पत्र आणले याला कुठलाही अर्थ नाही हे पत्र जनतेचा भ्रम करणारे आहे असे माजी जिप उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी सांगुन शिवसेनेच्या पत्रावर पत्रकार परिषदेत पलटवार केला. 
          १९६५ च्या कायद्यानुसार कर आकारणी करावीच लागते आणि ती कर आकारणी  केल्याशिवाय नगरपंचायत कशी चालणार आहे. दिवा बत्ती, आरोग्य सेवा पुरविणार कशा असे सांगुन मानकुमरे म्हणाले नगरपंचायतीवर सत्ता आमचीच येणार आहे आणि आम्हीच कर कमी करणार आहोत हे जनतेला सांगायचे आहे असेही वसंतराव मानकुमरे यांनी सांगीतले.
          ते पुढे म्हणाले उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री नाहीत. फक्त मेढ्यापुरती कर आकारणीला स्थगिती नसून संपूर्ण महाराष्ट्रात स्थगिती आहे. परंतु कोणीतरी भ्रम निर्माण करीत आहेत असे सांगत असे कदम आम्ही बरेच तीस वर्षात बघितले आहेत. निव्वळ जावलीच्या जनतेने मतदान केल असत तरी डिपॉझिट जप्त झाल नसतं अशी टिका अंकश कदम यांच्यावर मानकुमरे यांनी केली.
       ते पुढे म्हणाले जावली तालुका त्यांच्याबरोबर नाही त्यांना जे करायची ते त्यांनी करावी. आम्ही 17 च्या 17 उमेदवार उभे करणार आहोत. महायुतीच्या नेत्यांचा निर्णय आला तर तेव्हा पाहू काय करायचे ते. महायुती म्हणून ते आमच्यापर्यंत आले नाहीत. पहिली बॉडी आमची आहे तर आमचा अधिकार आहे. त्यांनी आमच्याशी बोलायला पाहीजे असे सांगुन मानकुमरे पुढे म्हणाले  सर्वांनी एकत्र एकत्र येवुन प्रयत्न केला तर नगरपंचायत बिनविरोध होईल आणि महाराष्ट्रात एक चांगला संदेश जाईल असेही सांगायला मानकुमरे विसरले नाहीत.
       मानकुमरे म्हणाले आम्हाला कुणाला अंगावर, शिंगावर घ्यायचे नाही. आम्ही मतदारांच्या दारात जाणार मतदान मागणार. नगर पंचायतीवर सत्ता आमचीच येणार असे ठणकावुन सांगत स्वराज्य पक्ष सोडून शिवसेनेत आलेल्या माणसाने आम्हाला शिवसेना शिकवायची काय असा प्रश्न उपस्थित करीत मी दोन वेळा लोकसभा लढवली आहे असे सांगुन शिंदे साहेबांचे आमचे संबंध चांगले आहेत. आम्ही शिष्टमंडळासह भेटून सांगणार आहोत या माणसाला आवारा नाहीतर आमच्याकडून काहीतरी घडलं तर आम्हाला बोलू नका. शिवेंद्र बाबांचे काम चांगले आहेत त्यामुळे जनता आम्हाला नाकारणार नाही असे सांगुन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एकनाथ ओंबळे, दोन्ही सचिन  त्यांनी कोणतं काम आणलं असेही वसंतराव मानकुमरे यांनी सांगीतले.
           यावेळी माझी बांधकाम सभापती विकास देशपांडे म्हणाले आम्हाला सहा महिनेच मिळाले 
ज्यांनी बेकायदेशीर,अनाधिकृत बांधकामे केली अशा २० ते २५ टक्के लोकांनांच जादा टॅक्स भरावा लागला. 2022 ला मुदत संपली आम्हाला वेळ कमी मिळाला. ज्यांनी विरोध त्यांनी केला पण आम्ही कुठ त्यांना विरोध करावा अस म्हटल नव्हतं असे सांगुन नगराध्यक्ष, प्रांत अधिकारी, मुख्याधिकारी, सभापती यांची कमिटी कराबाबत ठरवते, हरकती मागवितात, पेपरला देतात, त्यावेळी हरकती आल्या नाही असे सांगुन  आम्हाला सहा महिने मिळाले, संधी मिळाली नाही तर मुख्याधिकारींनी कर लादला असून त्याला बॉडीचा दोष नाही असे विकास देशपांडे यांनी सांगीतले.
-------------------------
शिवसेना नगर सेवकांनी करवाढीला विरोध केला पण इतरांनी तो जनतेल्या माथी मारला - अंकूश कदम

 मेढ्याच्या घरपट्टीचा मुद्दा हा चुकीच्या पद्धतीने जनतेवर लादला गेला. त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या वेळेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्याच वेळी आवाज उठवण्याचे, विरोध करण्याचे काम केले होते परंतु तत्कालीन इतर असणाऱ्या नगरसेवकांनी घरपट्टी वाढीला सहमती दिली होती. त्यामुळे इथल्या जनतेच्या माथी घरपट्टीचा कर मारला गेला असल्याचे वाशी येथिल शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी आरोप केला. 
          मेढा येथे घेण्यात आलेल्या परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले मेळाव्यात पालकमंत्र्यांनी उद्या गेल्या गेल्या घरपट्टीचा निकाल लावतो असे सांगीतले. आमचे नेते दिलेला शब्द पाळतात. तिसऱ्या दिवशी सहीचा जीआर आणून मेढा वाशीयांना दिला. ज्यांनी केले त्यांना श्रेय जाणार पण श्रेयवादापेक्षा जनतेचा प्रश्न जटील होतो होता. २ हजार मिळकत दहा हजारची घरपट्टी येत असेल तर तो त्रागा करणार. असे सांगुन कदम म्हणाले अनेक वेळा मेढेकरांनी आंदोलने केली. पाठपुरावा केला. मला समजलं 2023 साली पण असा जीआर निघाला होता. कोणी काढला, काय काढला पण तो जनतेच्या हितासाठी होता. चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणण्याचं काम आपलं आहे. पण इथले लोकप्रतिनिधी असतील इतर कोणीही प्रतिनिधी असतील त्यांनी पत्र दाखवून स्थगिती दिली का ? शासनाचा निर्णय येथील अधिकाऱ्यांना लागू होत नाही का? असा प्रश्न उपस्थित केले.
         येथील लोकांनी प्रश्न उठवले मग इथले लोकप्रतिनिधी कुठे गेले होते. पहिल्या पत्रानुसार पुन्हा एकदा स्थगिती देण्याचा प्रयत्न केला त्याचे स्वागत करणे ऐवजी राजकारण केलं जात आहे. इथली जनता सुजाण आहे. कर वाढीला कोणी सहमती दिली, कोणी विरोध केला तर तो आमच्या सेनेच्या नगरसेवकांनी केला होता तर आज राजकारण करणाऱ्यांनी त्याला सहमती दिली होती. आम्ही केलं तर ते चुकीचे आहे. सातारला स्थगिती मग आम्ही सावत्र आहे का ? असे सांगुन आमची सत्ता नसताना नगरपंचायत इमारत १ कोटी १० लाख, महादेव मंदिर 50 लाख, आनंद रस्ते १० लाख, स्मशानभूमी 2 कोटी 75 लाख, स्वच्छतागृह ३ लाख निधी दिला असे कदम यांनी सांगीतले.
         ते पुढे म्हणाले मेढयात स्वच्छता गृह नसल्याने माता भगिनींना पाहुण्यांच्या घरी जावे लागते ही तालुक्याच्या ठिकाणीची परिस्थिती आहे. सत्ता नसताना आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील यांच्या माध्यमातून एवढी कामे आणली. तरी त्याचा पाठपुरावा आम्ही चांगल्या पद्धतीने केला आहे असे सांगुन कदम म्हणाले २०२३ ला पत्र आणून अजूनही घरपट्टी तशीच घेतली जात आहे. येथील जनता सुज्ञ आहे. जनतेने ठरवायचे आहे. सातारची स्थगिती होते पण इथली स्थगित होत नाही. याला खोडा कोणी घातला आहे. तिथल्या जनतेने ठरवायचे आहे येणाऱ्या काळात जनतेने कौल कोणाला दिला पाहीजे. आपल्याला सावत्र कोणाला ठरवायचे हे येथील जनतेने ठरवायचे आहे असेही कदम यांनी सांगीतले.
          ते पुढे म्हणाले अंकुश कदम जावलीच्या भ्रष्टाचाराची पीएचडी करून आलेला आहे मला ते काढायला लावू नका अन्यथा पळता भुई कमी होईल असा इशारा देत विकास म्हणजे फक्त रस्ते आणि रस्त्यातून टक्केवारी हा विकास नाही असे सांगुन आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, धमकाऊ नका ही लोकशाहीची पद्धत नाही असे सांगायला शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम विसरले नाहीत.

To Top