Sugar Factory l 'सोमेश्वर' यंदाही राखणार उच्चांकी ऊस दराची परंपरा : पुरुषोत्तम जगताप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गाळप हंगाम सन २०२५-२०२६ साठी सोमेश्वर कारखान्याची एफ.आर.पी. प्रति टन ३ हजार २८५ इतकी येत असून कारखान्याने कायमच एफ.आर.पी. पेक्षा जादा ऊस दर दिलेला आहे. या हंगामामध्ये देखील उच्चांकी ऊस दराची परंपरा सोमेश्वर कारखाना कायम ठेवणार असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. 
             अध्यक्ष जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणटले आहे की, कारखाना कार्यक्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत. ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी झालेस कारखाना शेतकी खात्याशी संपर्क करावा तसेच सभासदांनी आपला ऊस जळीत करुन तोडणी करणेस संमती देवू नये. ज्या सभासदांना ऊस बीलामधून सोसायटीची रक्कम कपात करावयाची नाही अशा सभासदांनी कारखान्याकडे रितसर अर्ज करावेत. जगताप पुढे म्हणाले की, गाळप हंगाम सन २०२५-२०२६ साठी सभासद, शेअर्स मागणीदार व कार्यक्षेत्रातील बिगर सभासद यांचे फेब्रुवारी २०२६ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्रति टन १०० रुपये, मार्च २०२६ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्रति टन २०० रुपये व एप्रिल २०२६ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास टनाला ३०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागण करीत असताना ५ फुट सरीमध्येच ऊसाची लागण करावी जेणेकरुन ऊस तोडणी मजूरांच्या टंचाई अभावी ऊसाची तोड ऊस तोडणी यंत्राने करणे सोईचे होईल. गाळप हंगाम २०२६-२०२७ करीता ऊस तोडणी यंत्राने तोडणी केलेल्या ऊसास टनाला ५० रुपये अनुदान देणेत येईल. सभासद, बिगर सभासद यांनी कारखान्याकडे नोंदविलेला ऊस इतर कारखाना अथवा अन्यत्र विल्हेवाट लावू नये अन्यथा कारखान्याकडून दिल्या जाणाऱ्या सोई-सवलती बंद केल्या जातील त्यामुळे सभासद बांधवांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये असे आवाहन देखील जगताप यांनी यावेळी केले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व कारखान्याचे मार्गदर्शक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले


To Top