सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क साधत फलटण तालुक्यातील 35 वर्षीय तरुणाला हनी ट्रँपच्या जाळ्यात ओढत भादे गावच्या हद्दीत बोलावत अपहरण करुन बेदम मारहाण करणाऱ्या व खोटा अँट्रासिटी,विनयभंग अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी मागणा-या युट्युब पञकारासह तडीपार युवक,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खंडाळा तालुकाध्यक्षासह तिघांच्या मुसक्या शिरवळ पोलीसांनी अवघ्या एक तासांमध्ये आवळल्या आहे.
यामध्ये युट्युब पञकार किरण प्रकाश मोरे (मूळ रा.कर्नावड ता.भोर जि.पुणे सध्या रा.शिरवळ ता.खंडाळा),सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला विशाल महादेव जाधव,महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंडाळा तालुकाध्यक्ष इरफान दिलावर शेख (दोघे रा.शिरवळ ता.खंडाळा)असे जेरबंद केलेल्याची नावे आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि,फलटण तालुक्यातील 35 वर्षीय युवकाशी सोशल मिडीयाच्या इन्स्टाग्रामच्या महिलेच्या नावाने संपर्क साधत चँटिंग करीत व दुरध्वनीद्वारे संपर्क साधत तरुणाला कार (क्रं.एमएच-12-एनई-3972) ने भादे ता.खंडाळा गावच्या हद्दीत असणाऱ्या वीर धरण परिसरात बोलावून दोन दुचाकीवरुन आलेल्या युट्युब पञकार असणाऱ्या किरण मोरे, सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेल्या विशाल जाधव यांनी कारमध्ये घुसत तरुणाच्या कारमध्येच तरुणाचे अपहरण करीत फायबर काठी, हाताने तोंडावर व पाठीवर बेदम मारहाण करीत घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास खोटा अँट्रासिटी व विनयभंग अत्याचाराचा गुन्हा दाखल करत जेलमध्ये टाकण्याची तसेच खंडणी स्वरुपात तरुणाची कार तथाकथित युट्युब पञकार किरण मोरे याच्या नावावर करण्याची धमकी तरुणाला व कुंटुंबियांना संबंधित देत होते.यावेळी संबंधित तरुणाने शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोषी,अपर पोलीस अधिक्षक डाँ.वैशाली कडुकर,फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के,पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांची विविध पथके तयार करीत गुन्ह्यातील युट्युब पञकार किरण मोरे, सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला विशाल जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंडाळा तालुकाध्यक्ष इरफान शेख याच्या मुसक्या अवघ्या एक तासांमध्ये आवळत ताब्यात घेत मोठ्या शिताफीने शिरवळ पोलीसांनी अटक केली.यावेळी शिरवळ पोलीसांनी संबंधितांना खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने बुधवार दि.१२ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार हे अधिक तपास करीत आहे.
-----------------
तक्रार करण्याचे शिरवळ पोलीसांचे आवाहन-पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे
अश्याप्रकारचे संबंधित आरोपींचे विरोधात कोणाची काही एक तक्रार असल्यास निर्भिडपणे पुढे येवून शिरवळ पोलीस ठाणेस तक्रार नोंदविण्याचे आवाहन शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
