तयारी जिल्हा परिषद-पंचायत समितीची l जनसेवेचा ध्यास घेऊन शिंद गणातून मनीषा राहूल पारठे पंचायत समितीला लढणार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----  
भोर : संतोष म्हस्के
पंचायत समिती शिंद ता.भोर गणातून जनसेवेचा ध्यास मनी घेऊन तर जनतेच्या मनातील विश्वासक चेहरा म्हणून मनीषा राहुल ( महाराज) पारठे इच्छुक उमेदवार असून भाजपाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली येवू घातलेली निवडणूक लढवणार आहेत.मनीषा पारठे सांप्रदायिक व सुशिक्षित -सूसंस्कृत घराण्यातील असून त्यांचे शिक्षण डिप्लोमा इंजिनिअरिंग झाले असून एमए ऍपिअर आसल्याने सामाजिक कार्यासाठी तसेच लोकांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा हातभार लागणार आहे. पारठे ह्या लक्षतारा फाउंडेशन महा. राज्य. अध्यक्ष असून अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था, आपटी च्या कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतात. 
         हिरडस मावळ खोऱ्यातील वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले तसेच कुटुंबात तीन पिढ्याची वारकरी संप्रदायाची परंपरा जपलेले भोर बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव पारठे हे मनीषा पारठे यांचे सासरे त्यांचा सामाजिक कार्यात कायमच हिरगिरीने भाग असतो.तर कायम सामाजिक काम म्हणून मोफत आरोग्य शिबीर,डोळे तपासणी शिबीर, वसतिगृह चालवणे, वृक्षारोपण करणे, तीर्थायात्रा काढणे इत्यादी बरोबर आणि राजकीय क्षेत्रात प्रामाणिक काम करत असतात.त्याबरोबरच राज्यात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले ह.भ.प.राहूल महाराज पारठे त्यांच्या माध्यमातून सांप्रदायिक क्षेत्रातून समाजाची सेवा केली जाते. वारकरी सांप्रदायाची तीन पिढ्यांची परंपरा पार पाडत आसताना लहानपणापासून वारकरी संप्रदायात कार्यरत असल्याने गेल्या २० वर्षापासून बालकीर्तनकार ते युवाकीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर धार्मिक,अध्यात्मिक व हिंदुत्ववादी कार्य करत आहेत. झी टॉकीजच्या माध्यमातून अनेक वर्ष सातत्याने समाज प्रबोधनाचे कार्य करत आसल्याने त्यांचा तळागाळातील सर्वसामान्य जनतेतील लहान मुलांपासून ते थेट वयोवृद्ध मायबाप जनतेपर्यंत संपर्क आहे.तसेच वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनामध्ये त्यांचे मोलाचे शिवकार्य आहे.
      याच विचारधाळेमुळे महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर त्यांनी सर्वांच्या सहकार्याने उभे केले.गेल्या ५ वर्षांपासून अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील व राज्यातील विविध जिल्ह्यातील गोरगरीब,गरजू मुलांसाठी आध्यत्मिक व शैक्षणिक शिक्षणासाठी निवासी गुरुकुलची स्थापना केली. संस्थेत ३०० ते ४०० विध्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून सध्या ६० विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील ४० विध्यार्थी कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक म्हणून समाजात कार्यरत आहेत.या पार्श्वभूमीवर शिंद पंचायत समिती गणातून निवडणुक लढविणार असून समाजसेवा करण्यासाठी पुढे येणार असल्याचे इच्छुक उमेदवार मनीषा राहूल (महाराज) पारठे यांनी "सोमेश्वर रिपोर्टरशी" बोलताना सांगितले.


To Top