पुरंदर l १९ वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २३ नोव्हेंबर ला पुणे येथे होणार

सोमेश्वर रिपोर्टर live
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १९ वे अखिल भारतीय प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी दिली आहे. 
           या अगोदर महात्मा फुले यांचे मूळगाव 
खानवडी, सोलापूर, आमगाव, वर्धा आदी ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.समतेचे प्रणेते स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रसार व प्रसार व्हावा, म्हणून या साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी विविध ठिकाणी करण्यात येते.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुणे येथे बैठक पार पडली. 
     यावेळी परिषदेच्या राष्ट्रीय सचिव सुवर्णा पवार,राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर,राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, सुप्रसिद्ध ग्रामीण कवी किशोर टिळेकर,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोंगळे,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनील लोणकर,संतोष शेलार,महाराष्ट्र संघटक सचिव अमोल कुंभार, पुणे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विक्रम शिंदे,पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिभा मगर,पश्चिम महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष सुमेध गायकवाड,सरचिटणीस सुवर्णा वाघमारे,मराठवाडा उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे,शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर,जिल्हाध्यक्ष रमेश रेडेकर ,प्रा.सुरेश वाळेकर,मधुकर गिलबिले,पुणे विभागीय सरचिटणीस शर्मिला गायकवाड,आदी उपस्थित होते.
    संमेलनाचे अध्यक्षपद कवी किशोर टिळेकर हे भूषवणार आहेत. उद्घाटन सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष दत्तात्रय भोंगळे , निमंत्रक सुनील लोणकर व प्रमुख पाहुणे रामदास अभंग हे आहेत.
   ग्रंथपूजनाने या संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ,पुरस्कार वितरण,परिसंवाद कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे देशभरातून मोठ्या संख्येने साहित्यिक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध साहित्य संमेलनं देशभरात साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या नेतृत्वात आयोजित केली जातात.हे १८८ साहित्य संमेलन आहे. इतकी साहित्य संमेलनं आयोजित करणारी साहित्य विश्वातील हि एकमेव साहित्य संस्था आहे.
To Top