सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
सिंगापूर (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना शिंदे गटाचे विक्रांत सुरेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी नीलम धाऊत्रे यांनी जाहीर केले. ही निवडणूक अध्यासी अधिकारी तथा सरपंच अर्चना लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपसरपंच विशाल शांताराम लवांडे यांनी राजीनामा दिल्यामुळे या रिक्त जागी निवड करण्यात आली.
आमदार विजय शिवतारे यांनी उपसरपंचपदी विक्रांत पवार यांची निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. उपसरपंच निवडप्रसंगी सिंगापूर ग्रामपंचायत सदस्य सौरभ लवांडे, संगिता वारे, चांगुणा वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी गाव कारभारी मा. सरपंच दशरथ लवांडे, जयश्री वारे,रामकृष्ण वारे, संदिप लवांडे, सुनील लवांडे, काळूराम लवांडे, सोपान पवार, हनुमंत वारे, शांताराम लवांडे,बापू झेंडे, दिलिप वारे,सरस्वती वाघमारे आदी उपस्थित होते.
उपसरपंच विक्रांत पवार यांचे जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव,उपजिल्हाप्रमुख उमेश गायकवाड,रामदास मेमाणे, राजेंद्र झेंडे, विशाल रावडे, महेश लवांडे, प्रविण लवांडे, विशाल लवांडे, सुमित वारे, रामदास लवांडे,बाळासाहेब मगर, संदिप पोमण, सागर कुदळे, अमोल मेमाणे, दादा बडधे,सागर यादव , बाळासाहेब वारे,शामराव भालेकर, किसन बडधे, प्रदिप दगडे
यांनी उपस्थित राहून अभिनंदन केले.
उपसरपंच पदी निवड झाल्या नंतर विक्रांत पवार म्हणाले आमदार विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिंगापूर पंचक्रोशीतील जेष्ठ मान्यवर पदाधिकारी यांच्या सूचनेनुसार विविध शासकीय योजना व निधी आणून सिंगापूर ग्रामपंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत राहणार आहे.
