Bhor News l भोरला भाजपा नगराध्यक्षपदाचा घोळ मिटेना...! मात्र जनतेतून गणेश पवार यांच्या नावाला पसंती

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रामुख्याने भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी निवडणूक होणार असली तरी भाजपाच्या गोटातील नगराध्यक्ष पदाचा घोळ काही मिटेना असे चित्र आहे.भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी संजय जगताप तसेच गणेश पवार इच्छुक असून नामनिर्देशन पत्र भरण्याचे शेवटचे दोन दिवस राहिले असले तरी पक्षाच्या वरिष्ठांकडून उमेदवार जाहीर होत नसल्याने नगराध्यक्षाचा पेच कायम आहे.दरम्यान तरुणांचे आशास्थान,सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्या नावाला जनतेतून मोठी पसंती असल्याचे समोर येत आहे.
     राजकीय वलय असलेल्या पवार घराण्यातील गणेश पवार यांनी मागील पंचवार्षिकला माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक,उपनगराध्यक्ष पद भूषवले आहे.त्यांचा जनसंपर्क दांडगा असून प्रशासनाचा अनुभव असलेले तसेच समाज हितासाठी झगडून एकसंघ राहत नागरिकांची विविध कामे करण्यात हातखंडा आहे. त्यांनी विविध सामाजिक राबवलेले उपक्रम याच्या माध्यमातून जनमनात तसेच तरुणांमध्ये गणेश पवार यांचे नाव घरा घरात मनमनात कोरले गेले आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला नसल्याने नगराध्यक्षांचा तिढा कायम आहे.
To Top