Rajgad Fort l मिनल कांबळे l राजगड किल्ल्यावर माकडे खेळताना दगड निसटला : दगड डोक्यात पडल्याने ३८ वर्षीय महिला जखमी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील राजगड किल्ल्यावर जात असताना वाटेत एका 38 वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड पडून महिला जखमी झाली असून तिला प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली.
         याबाबत अधिक माहिती अशी की किल्ले राजगड वर मुंबई येथून 20 महिलांचा ग्रुप आला होता बालेकिल्ला खाली चालत असताना वर माकडे खेळत होती खेळताना माकडाकडून दगड महिलेच्या डोक्यात पडला. मुंबई येथील वर्षा हुंडारी (वय अंदाजे 30 ते 40) असून डोक्यातून रक्त येत असल्याने किल्ल्यावरील पहारेकरी विशाल पिलावरे, बापू साबळे, दादु वेगरे यांनी प्रसंगावधान दाखवून  येथील मुलांच्या मदतीने या महिलेला अवघ्या तीस मिनिटात किल्ल्याचा खाली आणून एका खासगी गाडीने पुढील उपचारासाठी पाठविले.
         पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार सोमेश राऊत यांनी 108 क्रमकांच्या रुग्ण वाहिकेशी संपर्क साधून गाडी बोलावून महिलेला खासगी गाडीतून घेऊन पुढे उपचारासाठी दाखल केले. याबाबत पहारेकरी विशाल पिलावरे, बापू साबळे, दादु वेगरे यांचे पर्यटक व ग्रामस्थांनी आभार मानले
To Top