Sugar Factory l 'श्रीराम' पाठोपाठ 'साखरवाडी'ने फोडली फलटण तालुक्यातील ऊसदराची कोंडी : श्रीदत्त इंडिया देणार टनाला ३३०० रुपये

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
साखरवाडी : गणेश पवार
फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडत ३३०० रुपये दर देण्याची घोषणा नुकतीच केली होती त्या पाठोपाठ फलटण तालुक्यातील श्रीदत्त इंडिया प्रा लिमिटेड या साखर कारखाने सुद्धा ऊसदराची कोंडी फोडली असून गळीत हंगाम  २०२५/ २६ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला ३ हजार ३०० रुपये प्रति टन इतका दर देणार असल्याचे कंपनीचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले.
कंपनीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली अजितराव जगताप म्हणाले, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्री दत्त इंडिया कंपनीच्या अध्यक्षा प्रीती रूपारेल व संचालक जितेंद्र धारू यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी सुयोग्य मार्गक्रमण करत असून या हंगामामध्ये शासन निर्णयानुसार आमच्या कंपनीला ३हजार ५६ रुपये  रुपये इतकी एफआरपीची रक्कम देय बंधनकारक आहे मात्र शेतकरी व संघटना यांच्या मागणीचा सुयोग्य विचार करून या पेक्षा २४४ रुपये अधिकची रक्कम कंपनी देणार असून गाळपास आलेल्या उसाच्या पहिल्या पंधरवड्याचे पेमेंट हे रुपये ३२०० प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असून उर्वरित १०० रुपयाची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे  सांगितले तसेच फलटण तालुक्यासह कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याला घालून सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी या बैठकीला जनरल मॅनेजर (केन) सदानंद पाटील, केन मॅनेजर रमेश बागणवर, टेक्निकल युनिट हेड अमोद पाल, डी जी एम अजित कदम,शेतकी अधिकारी  दिगंबर माने,   फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, ऊस पुरवठा अधिकारी सुहास गायकवाड, पोपटराव भोसले, पै संतोष भोसले, ग्रा प  सदस्य मच्छिंद्र भोसले, संजय जाधव उपस्थित होते
To Top