सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
सुपे खुर्द (ता.पुरंदर) येथील शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व फिलिप्स कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी तुकाराम गणपत जगताप (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सुपे खुर्द गाव व शाळा विकास कामात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
त्यांच्या पाठीमागे तीन मुले ,दोन मुली ,सूना, जावई,नातवंडे असा परिवार आहे.
