सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक घटकाचा या पुरस्कारामध्ये मोलाचा वाटा आहे. यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची शान वाढली असून बारामती सहकारी उद्योगाला राष्ट्रीय पातळीवर चांगली ओळख मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फ़ेसबुकवर पोष्ट करत बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कौतुक केले आहे.
नुकताच सोमेश्वर कारखान्याला पुणे-मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा राज्यातील उत्कृष्ट साखर कारखाना म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. मानचिन्ह व प्रशस्तिपत्र तसेच रोख पाच लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. यापूर्वी कारखान्याने उत्कृष्ट कार्यकारी संचालक, उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर, उत्कृष्ट चीफ केमिष्ट हे तीन वयक्तिक पुरस्कार पटकावले असून उत्कृष्ट आर्थिक नियोजन, उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, देशपातळीवर सर्वोकृष्ठ कारखाना, कोजन असोसिएशनचे देशपातळीवरील सर्वोकृष्ठ पुरस्कार तसेच देशपातळीवर उत्कृष्ट डिस्टलरी पुरस्कार यापूर्वी पटकावले आहेत. सन २०२३-२४ चा देश पातळीवरील नॅशनल फेडरेशनचा देशातील सर्वोकृष्ठ कारखाना व यावर्षीचा २०२४-२५ चा व्हिएसआयचा सर्वोकृष्ठ कारखाना पुरस्कार मिळाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर कारखान्याचे कामकाज सुरू आहे. सोमेश्वर कारखान्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुकाची थाप दिली असून अभिनंदन केले आहे.
---------------------------
याबाबत उपमुख्यमंत्री पवार फेसबुक पोस्ट करत सर्वांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी केलेल्या फेसबुक पोष्ट करत म्हणटले आहे की, सोमेश्वर साखर कारखान्याला गाळप हंगाम २०२४-२५ साठी वसंतदादा पाटील साखर संस्थेचा सर्वोत्तम साखर कारखाना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
हा पुरस्कार उत्कृष्ट आर्थिक नियोजन, उत्तम तांत्रिक क्षमता, ऊस विकास, नफा निर्देशांक व व्यवस्थापनाच्या जोरावर प्राप्त झालाय, यामध्ये कारखान्यात कार्यरत प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे. यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची शान वाढली आहे आणि बारामती सहकारी उद्योगाला राष्ट्रीय पातळीवर चांगली ओळख मिळाली आहे. या यशामुळे महाराष्ट्राच्या सहकारी साखर उद्योगाचं भविष्य अधिक उज्ज्वल आणि उत्कर्षाच्या दिशेनं झेपावलं आहे. याबद्दल मी कारखान्यातील चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी वर्ग, कामगार वर्ग, तोडणी मजूर असं सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो.
