सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील श्री शहाजी माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात हिमोग्लोबिन मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
येथील रोटरी क्लब ऑफ सुपे परागणा यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील इयत्ता ५ वी ते १० वी या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. तसेच काही विद्यार्थ्यांमध्ये रक्ताची कमतरता आहे. अशा विद्यार्थ्यांना त्यांना तीन महिन्याच्या रक्त वाढीच्या गोळ्या मोफत देण्यात आल्या.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सुपे परगना अध्यक्ष पोपट चिपाडे, सचिव अशोक बसाळे, संस्थापक सुभाष चांदगुडे, अरुण कुतवळ, संपतराव जगताप, आरसीसीचे अध्यक्ष सुर्यकांत कुंभार, सचिव प्रकाश चौधरी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा लोणकर, उपमुख्याध्यापक डी. बी. यादव, पर्यवेक्षक एस. एस. करे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बनसोडे यांनी केले. तर आभार आर. एच. जगताप यांनी मानले.
............................
