सुपे परगणा l सुप्यातील शहाजी विद्यालयात मानक लेखन स्पर्धा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील श्री शहाजी माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात मानक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
      या स्पर्धेत ६२ विद्यार्थ्यांनी बिस्किटाचे मानक लेखन करण्यात आले. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ सुपे परगना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शालोपयोगी वस्तू बक्षीस स्वरुपात देण्यात आल्या. 
    भेसळयुक्त पदार्थांबाबतच्या जनजागृतीसाठी संपूर्ण भारतभर शालेय स्तरावरती 'भारतीय मानक ब्युरो' अंतर्गत स्टॅन्डर्ड ( दर्जा ) क्लब स्थापन करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना याबद्दल जनजागृती निर्माण झाल्यास वस्तूची  खरेदी करत असताना त्या वस्तूची गुणवत्ता व दर्जा तपासला जाईल. त्यामुळे होणारी ग्राहकांची फसवणूक या 'भारतीय मानक ब्युरो' द्वारे थांबवता येईल. त्यामुळे विद्यालयात मानक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
       या स्पर्धेमध्ये इयत्ता दहावी तुकडी ड मधील विद्यार्थिनी श्रेया संदीप होले व प्राची महादेव शितोळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच दहावी तुकडी ड मधीलच विद्यार्थिनी दिव्या कुंडलिक सकट व पायल अरविंद शेळके यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर इयत्ता नववी तुकडी क मधील विद्यार्थिनी अक्षदा रणजीत चांदगुडे व अनुष्का आप्पा काळखैरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक समीक्षा सुखदेव हंबीर व सिद्धी गणेश हिरवे या विद्यार्थिनींना मिळाले.या विद्यार्थ्यांना विद्यालयातील क्लबच्या समन्वयिका एस. बी. जगताप आणि विज्ञान शिक्षिका व्ही. व्ही. कड यांचे मार्गदर्शन लाभले.   
          तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 'यंत्र उत्सव २०२५' ऑनलाइन रोबोटिक्स मोडेल मेकिंग स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या इयत्ता सातवी तुकडी क मधील अविराज संतोष जुन्नरकर या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या विद्यार्थ्यास विज्ञान शिक्षक एस.व्ही.चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. तर श्री शहाजी विद्यालयात 'स्टॅन्डर्ड रायटिंग कॉम्पिटिशन' मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 
      याप्रसंगी यावेळी रोटरी क्लब ऑफ सुपे परगना अध्यक्ष पोपट चिपाडे, सचिव अशोक बसाळे, संस्थापक सुभाष चांदगुडे, अरुण कुतवळ, संपतराव जगताप, आरसीसीचे अध्यक्ष सुर्यकांत कुंभार, सचिव प्रकाश चौधरी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा लोणकर, उपमुख्याध्यापक डी. बी. यादव, पर्यवेक्षक एस. एस. करे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बनसोडे यांनी केले. तर आभार आर. एच. जगताप यांनी मानले.
     .............................................
To Top