Baramati Breaking l देवदर्शनावरून परतताना बारामतीतीच्या जगताप कुटुंबावर काळाचा घाला : भीषण अपघातात पती-पत्नीच्या दुर्दैवी मृत्यू तर दोघे जखमी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----               
बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुणे-बंगलोर हायवेवर भीषण अपघातात एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण जखमी झाले आहेत. 
         याबाबत मिळालेली माहिती अशी की, तिरुपती बालाजी येथून दर्शन घेऊन बारामतीकडे परतताना बारामतीतील कुटुंबाचा भीषण अपघात झाला आहे.
              यामध्ये श्रीरामनगर येथील पती-पत्नीचा
दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांची दोन मुले या अपघातात जखमी झाली आहेत. कर्नाटक राज्यातील हुबळीनजीक पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
या घटनेत बारामती येथील डायनामिक्स डेअरी या कंपनीत नोकरी करणारे अनिल सदाशिव जगताप (वय ५०), त्यांच्या पत्नी पत्नी वैशाली अनिल जगताप
( वय ४५, रा. श्रीरामनगर, बारामती) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुले अथर्व (वय २४) व अक्षता (वय २०) हे या अपघातात जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अनिल जगताप हे कुटुंबियांसह तिरूपती बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना आज पहाटे चार
वाजण्याच्या सुमारास हुबळीजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला.
          समोरून जात असलेल्या ट्रकने अचानक
ब्रेक दाबल्याने जगताप यांची कार ट्रकवर आदळून हा अपघात झाला. त्यामध्ये अनिल जगताप व त्यांच्या पत्नी वैशाली यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असलेली त्यांची दोन्ही मुले या अपघातात जखमी झाली आहेत. त्यांना हुबळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
         दरम्यान, जगताप दांपत्यावर उद्या सकाळी
बारामतीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे बारामतीत हळहळ व्यक्त होत आहे.
To Top