सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील माळवाडी ( लोणी ) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत बारामती येथील शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे रांगोळीच्या माध्यमातून माळवाडी गावाचा नकाशा साकारण्यात आला होता. येथील ग्रामपंचायत सदस्य अनिल लडकत व मुख्याध्यापिका अनिता कोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी येथील सरपंच मंजू लडकत, उपसरपंच गणेश बोरावके, कृषी सल्लागार व ग्रामपंचायत सदस्य अनिल लडकत, तलाठी विकास बारवकर, कृषी सहाय्यक तृप्ती गुंड आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी प्रतिक्षा भारती, तन्वी देशमुख, प्रगती कुलकर्णी, मायावती चोरमले, संजीवनी गुंड या कृषी कन्यांनी गावातील मान्यवरांना जमिनीशी आणि संस्कृतीशी नाळ जोडणारे असे प्रतीक आंब्याचे रोपटे आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा सूर्यवंशी यांनी केले. तर आभार साक्षी सोनवलकर यांनी मानले.
..............................
