Baramati Crime l फ्लॅटच्या हप्त्यांसाठी व ‘थार’ गाडीच्या मागणीसाठी विवाहितेवर सासरकडून छळ : वडगाव निंबाळकर पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे सासरी राहणाऱ्या एका 29 वर्षीय विवाहितेवर पतीसह सासरच्या मंडळींकडून सातत्याने शारीरिक, मानसिक छळ करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
         याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांत २९ वर्षीय विवाहिता मूळ रा. वडगाव रासाई, सध्या रा. वाणेवाडी ता. बारामती) यांनी पोलिसांत तक्रारी दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती निखील रमेश शितोळे, संगीता रमेश शितोळे, रमेश दयाराम शितोळे आणि पूजा विजय खराडे यांनी विविध कारणांवरून तिच्यावर अत्याचार केले.
       तक्रारीनुसार, दिनांक 15 सप्टेंबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सासरच्या सर्व आरोपींनी पती निखील शितोळे यांस फ्लॅटच्या हप्त्यांसाठी 30 हजार रुपये तसेच ‘थार’ गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणून द्यावेत, असा दबाव टाकत फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक त्रास दिला. पैशांची मागणी न मानल्याने फिर्यादीवर सतत अत्याचार वाढले. या छळाचा कळस तेव्हा झाला, जेव्हा 27 नोव्हेंबर 2025 रोजी पती निखील शितोळे यांनी फिर्यादीच्या हाताच्या कोपरावर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. त्याचदरम्यान आरोपी संगीता शितोळे यांनी फिर्यादीच्या चेहऱ्यावर चापट मारून दुखापत केली, तर आरोपी रमेश शितोळे यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीने पोलिसांत सांगितले.
To Top