सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
जमिनीच्या वादातून एकाचे वडगाव निंबाळकर येथून अपहार करत त्याला मावळ तालुक्यातील उर्से येते नेत लाकडी दांडक्याने मारहाण केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी संदीप गोरख होळकर रा. सदोबाचीवाडी ता. बारामती जि.पुणे. याला दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वडगाव निंबाळकर येथील हाॅटेल इंडीया बार व परमिट रूम येथुन उर्से ता. मावळ जि.पुणे येथील जमीनीचे वादातील राग मनात धरून आरोपी तेजस उर्फ बंटी हनुमंत होळकर याने व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांनी जबरदस्तीने पांढरा रंगाचा स्विप्ट कार मध्ये बसवुन अज्ञात ठिकाणी कॅनाॅलचे कडेला असलेल्या उसाचे शेतात नेवुन लाकडी दांडक्याने मारहाण केली.
त्यावेळी फरार आरोपी शंभु दादासो कारंडे याला बंटी होळकर याने मोबाईलवरून व्हिडीओ काॅल करून मारहाण करत असताना चा व्हिडीओ दाखविला. शंभु कारंडे याचे व आमचे नादाला लागला तर जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर फिर्यादी यास दारू पाजुन होळ ता. बारामती येथे आणून सोडुन दिले व आरोपी फरार झाले होते. त्याबाबत तक्रारदार संदीप गोरख होळकर याने वडगाव निंबाळकर पोलीस स्थेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी तेजस उर्फ बंटी हणुमंत होळकर यास ताब्यात घेवुन यातील तीन अनोळखी आरोपी साहील लक्ष्मण गायकवाड वय २२ वर्षे, रा. मुरूम ता.फलटण जि.सातारा. संकेत नामदेव भिसे वय २२ वर्षे,रा- होळ, ता.बारामती,जि.पुणे. सनि संदीप सकट वय २३ वर्षे, रा.आनंदनगर,सस्तेवाडी ता.बारामती जि. पुणे. यांची नावे निष्पन्न करून त्यांना तत्काळ अटक करून त्यांना न्यायालयापुढे हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेवून रिमांड मध्ये अटक आरोपी यांचेकडून गुन्हयात वापरलेली पांढरे रंगाची स्विप्ट गाडी एम.एच १४ जी वाय २२०० व लाकडी दांडके पुरावेकामी जप्त करण्यात आले आहे. तसेच हाॅटेल इंडीया बार व परमिट रूम वडगांव निंबाळकर येथील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे.
यातील अटक आरोपी यांना मा. न्यायालय यांनी न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास चालु आहे. पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.
