सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोरच्या ग्रामीण भागासह शहरात बहुतांशी जिद्द चिकाटीच्या जोरावर नाविन्य मिळवणारे होतकरू तरुण-तरुणी आहेत.त्यांच्याकडून समाज हितासाठी झगडून सामाजिक बांधिलकी जपून भविष्य घडविण्यासाठी अहोरात्र कष्ट केले जात आहेत. त्यांच्या कष्टाचे चीज झाले असून बहुतांशी जण शासकीय सेवेमध्ये रुजू झाले आहेत.तर अनेक जणांनी खेळामध्ये प्रावीण्य मिळवले आहे. नवनिर्वाचित शासकीय सेवकांनी सर्वसामान्य गोरगरिबांसाठी काम करावे असे मत माजी उपसभापती मानसिंग धुमाळ यांनी व्यक्त केले.
भोर येथे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुक्यातील नवनिर्वाचित शासकीय सेवेत रुजू झालेले तसेच आरोग्य,सामाजिक, शैक्षणिक,कला- क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवनाऱ्या तरुण- तरुणींच्या सन्मान सोहळ्यात सोमवार दि.२९ धुमाळ बोलत होते.यावेळी बाजार समिती माजी उपसभापती लक्ष्मण पारठे,अरुण मालुसरे,डॉ.आनंदा कंक,अनंता दुरकर,सुरेश राजीवडे,अध्यक्ष शरद बांदल,सचिव दीपक पारठे,मनोज धुमाळ,सीमा तनपुरे,प्रशांत बांदल,अरुण राजीवडे,माऊली बदक,संतोष कदम आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष शरद बांदल बोलताना म्हणाले मागील तीन-चार वर्षांपासून समाज हितासाठी झगडून समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी संस्थेकडून अहोरात्र प्रयत्न केला जातो.तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळत आहे.संस्था वृक्षारोपण, गरजूंना शालेय साहित्य वाटप,मोफत आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर असे नवनवीन उपक्रम दरवर्षी राबवीत असते.यंदा नवीनच उपक्रम राबवून तालुक्यात शासकीय सेवेत स्थान मिळवलेल्या तसेच विविध खेळांमध्ये चमकून तालुक्याचे नाव रोशन करणाऱ्या ४० जणांचा यथोचित सन्मान केला गेला आहे.
