Baramati News l बारामती तालुक्यातील सलून दुकाने बंद ठेवुन निषेध

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव 
बारामतीसह तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी नाशिक जिल्ह्यातील खमतान गावात झालेल्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी ( दि. १५ ) आपली सर्व सलून दुकाने बंद ठेवुन निषेध व्यक्त केला. 
    यावेळी शासनाने दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी प्रांत कार्यालयात समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. 
        नाशिक जिल्ह्यातील खमतान गावात झालेल्या नाभिक समाजातील अल्पवयीन मुलीवर खाऊचे अमिष दाखवून गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने पाशवी अत्याचार केला. त्यानंतर कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेच्या निषेधार्थ बारामतीसह तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी सलून दुकाने बंद ठेवली होती. 
      यासंदर्भात प्रांत कार्यालयात तालुक्यातील सर्व नाभिक बांधव सोमवारी एकत्र आले होते.
तसेच शासनाने दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले. यावेळी बारामती शहराध्यक्ष रोहन शिंदे, सचिव आदेश आपुणे, ग्रामीणचे तालुकाध्यक्ष धीरण पवार, तालुकाउपाध्यक्ष पुष्पा जाधव, जेष्ठ मार्गदर्शक व माजी नगरासेवक अनिल दळवी, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील जगताप, मनोज जाधव, माजी अध्यक्ष सुधाकर माने, हेमंत जाधव, मारूती कर्वे, नवनाथ आपुणे, दत्तात्रय सपकळ, आकाश काळे, महादेव साळुंके, राजू वाघ, किरण कर्वे आदीसह सर्व नाभिक बांधव उपस्थित होते. 
           ................................
To Top