सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर - मांढरदेवी मार्गावरील आंबाडे ता.भोर घाटाच्या प्रवेशद्वाराजवळील वळणाचा चालकाला अंदाज न आल्याने मांढरदेवीला जाणारे चारचाकी वाहन २५ ते ३० फूट खड्ड्यात पडून अपघात झाल्याची घटना सोमवार दि.१५ रोजी रात्रीच्या वेळी घडली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार भोर वरून मांढरदेवीकडे जाणारी चारचाकी टाटा कंपनीची कार आंबाडे बस स्थानकजवळील वळणाचा अंदाज न आल्याने खोल खड्ड्यात पडले.कारमध्ये तीन ते चार प्रवासी होते.स्थानिक आंबाडे येथील तरुणांना अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत करून बाहेर काढले.नशीब बलवत्तर म्हणून अपघात ग्रस्त गाडीला एअरबॅग असल्याने प्रवासी बचावले.या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या भोर - मांढरदेवी मार्गाचे नूतनीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आले असून रस्ता वाहतुकीसाठी सुसाट झाला असल्याने वाहनचालक वेग-मर्यादा न राखता वाहने बेजबाबदारीपणे चालवत असतात.यामुळे अपघात होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. भोर- मांढरदेवी बेजबाबदारपणे सुसाट वाहने चालवून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या वाहन चालकांवर संबंधित विभागाने कारवाई करावी अश मागणी
स्थानिकांकडून होत आहे.
