सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोंढवा : प्रतिनिधी
बांगलादेशी तरुणींना देहविक्री करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. बोपदेव घाट परिसरातील एका लॉजवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी लॉजचा व्यवस्थापक रवी छोटे गौडा (४६, रा. येवलेवाडी, कोंढवा) आणि कामगार सचिन प्रकाश काळे (४०) यांना अटक करण्यात आली. कोंढवा पोलिसांचे पथक गस्त घालत होते. बोपदेव घाट परिसरातील एका लॉजमध्ये बांगलादेशी तरुणींना देहविक्री करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची पोलिस कर्मचारी अमोल हिरवे यांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. यानंतर लॉजवर छापा टाकण्यात आला. तेथे दोन बांगलादेशी तरुणी आढळून आल्या. चौकशीत लॉजचा व्यवस्थापक रवी गौडा याने दलालामार्फत या तरूणींना आणल्याची माहिती मिळाली. तरुणींच्या असहाय्यतेचा फायदा घेतल्याची माहिती तपासात मिळाली.
