सोमेश्वर रिपोर्टर टीम----
शिरवळ : प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील लोणंद-शिरवळ रस्त्यावरील वीर धरणालगत तोंडल गावच्या हद्दीत भरधाव वेगाने असलेल्या कारने लोणंद बाजूकडून शिरवळ बाजूकडे येणा-या कारला दिलेल्या धडकेत कारचालक जागीच ठार तर रस्त्यावरील पादचा-यांसहित सात जण गंभीर जखमी झाले आहे.यामध्ये कारचालक सलीम हमीदभाई शिकलगार(वय 45,रा.शिरवळ ता.खंडाळा)असे अपघातामध्ये ठार झालेल्या कारचालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,शिरवळ ता.खंडाळा येथील सलीम हमीदभाई शिकलगार हे आपली कार (क्रं-एमएच-12-एसक्यू-8309) ने काही कामानिमित्त लोणंद याठिकाणी गेले होते.यावेळी सलीम शिकलगार हे काम उरकून परत शिरवळ बाजूकडे येत असताना कार वीर धरणालगत असणाऱ्या तोंडल ता.खंडाळा गावच्या हद्दीत आली असता शिरवळ बाजूकडून लोणंद बाजूकडे भरधाव वेगाने निघालेल्या कार (क्रं-एमएच-13-ईसी-1997) ने जोरदार धडक दिली.या धडकेमध्ये कारमधील व रस्त्यावरुन शिरवळबाजूकडे महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्ता बंद असल्याने लोणंदला जाणाऱ्या मार्गावरुन चालत निघालेल्या कारचालक सलीम शिकलगार व तीन महिलांसह सात जण गंभीर जखमी झाले.यावेळी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने शिरवळ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी,सारोळा महामार्ग मदत केंद्राचे पोलीस अधिकारी,कर्मचारी व शिरवळ रेस्क्यु टिम सदस्यांनी धाव घेत शिरवळ ग्रामपंचायत रुग्णवाहिका,108 रुग्णवाहिका व खाजगी वाहनातून गंभीर जखमींना शिरवळ,लोणंद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता कारचालक सलीम शिकलगार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.यावेळी सलीम शिकलगार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.दरम्यान,घटनास्थळावरून अपघातानंतर कारचालकाने पलायन केल्याने पोलीसांकडून कारचालकाचा शोध सुरु होता.यावेळी राञी उशिरापर्यंत शिरवळ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
