सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भाटघर जलाशयाच्या पश्चिमेकडील पसुरे- पांगारी ता.भोर मार्गावर शेतातील भाताचा भेळा ट्रॅक्टरमध्ये हेल लावून घरी नेताना रस्त्यावर लोमणाऱ्या वीज वाहकतारांच्या उडालेल्या ठिणग्यांमुळे ७०० भात भेळ्याला रविवार दि.२१ रोजी आग लागली.त्यात शेतकऱ्याच्या जनावरांचा चारा जळून खाक झाला.या घटनेत शेतकऱ्याचे २० हजाराहून अधिक नुकसान झाले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी विकास कांबळे हे स्वतःच्या शेतातील भात भेळा ट्रॅक्टरच्या साह्याने हे लावून घरी घेऊन जात होते.घरी जात असताना ट्रॅक्टर मधील गवताच्या हेलाला रस्त्यावर सुरे गावाच्या जवळच लोमकळणाऱ्या महावितरणच्या तारांच्या ठिणग्या गवतावर पडल्या.ट्रॅक्टर मधील गवताने तात्काळ पेठ घेतला.काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने भात भेळा जागेवर जळून खाक झाला तर ट्रॅक्टर ट्रॉलीचेही मोठे नुकसान झाले. शेतकऱ्याचे नुकसान होऊन जनावरांचा चारा जळून गेल्याने पसुरे परिसरातील शेतकऱ्यांकडून हळूहळू व्यक्त होत आहे. स्थानिक तरुणांनी आग विझवण्याचा सचोटीने प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणावर असल्याने चारा पूर्णता जळून गेला.
