Bhor Breaking l थंडीचा फायदा घेत दुकान फोडून चोरट्यांनी ५५ हजारांची रोकड लांबवली

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील चौपाटी-मंगळवार पेठ मार्गावरील चौपाटी वेताळ पेठ येथील जिल्हा बँकेच्या शेजारच्या इमारतीतून दुसऱ्या मजल्यावरील युनिक सलूनचे दुकान फोडून एका चोरट्याने ५५ हजार लांबवण्याची घटना गुरुवार दि.१८ पहाटेच्या वेळी घडली. याची फिर्याद विशाल अशोक शिर्के (रा. खानापूर ता.भोर) यांनी भोर पोलीसात दिली.
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा बँकेच्या शेजारील इमारतीत फिर्यादी विशाल शिर्के यांचे दुसऱ्या मजल्यावर युनिक  सलूनचे दुकान असून या दुकानात पन्नास हजारांची रोख रक्कम दुकानातील गल्ल्यात ठेवली होती.अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी दुकान फोडून दुकानातील लॉकर व गल्ल्यातील रोख रक्कम चोरून नेली. मागील वर्षी थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी एका चोरट्याने रात्रीच्या वेळी तीन घरे फोडून जवळजवळ १५ लाखांच्या दागिन्यांसह दोन लाखांच्या रोकड रकमेची चोरी केली होती. याचा तपास भोर पोलिसांनी चार- पाच दिवसात लावला होता.त्या चोरीच्या तपासाप्रमाणे गुरुवार दि. १८ झालेल्या चोरीचा तपास भोर पोलिसांनी लावावा असे नागरिकांकडून बोलले जात आहे.तर शहरातील महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यावरील इमारतीत ५० हजारांची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार धर्मवीर खांडे करीत आहेत.
To Top