सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर-कापूरव्होळ मार्गावर बुवासाहेबवाडी ता.भोर येथे दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत संगमनेर ता.भोर येथील अशोक किसन बांदल (वय -६०) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि.२४ रोजी घडली.तर दुसरा भोर शहरातील तरुण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार भोर बाजूकडून कापूरहोळच्या दिशेने जाणारी (एमएच १२ वायवाय १३८८ ) दुचाकी तर संगमनेर येथून भोरकडे येणारी (एमएच १२ डीएक्स ४९४८ )दुचाकी यांची बुवासाहेबवाडी येथील चडाच्या वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली.या दुचाकींच्या धडकेत दोन्ही दुचाकी चालक गंभीर जखमी झाले.तर काही वेळातच संगमनेर येथून भोरला येणाऱ्या अशोक बांदल रा.संगमनेर यांना जोरदार मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.भोर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमी तरुणाला उपचारासाठी भोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
