सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राज्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा चा सर्वोकृष्ट कारखाना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार २९ डिसेंबर रोजी पुणे-मांजरी येथे हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
पुण्यातील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था दरवर्षी राज्यातील उत्कृष्ट कारखान्यांचा गौरव करत असते. यावर्षीचा २०२४-२५ सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सोमेश्वर कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे. मानचिन्ह व प्रशस्तिपत्र तसेच रोख पाच लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. यापूर्वी कारखान्याने उत्कृष्ट कार्यकारी संचालक, उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर, उत्कृष्ट चीफ केमिष्ट हे तीन वयक्तिक पुरस्कार पटकावले असून उत्कृष्ट आर्थिक नियोजन, उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, देशपातळीवर सर्वोकृष्ठ कारखाना, कोजन असोसिएशनचे देशपातळीवरील सर्वोकृष्ठ पुरस्कार तसेच देशपातळीवर उत्कृष्ट डिस्टलरी पुरस्कार यापूर्वी पटकावले आहेत. सन २०२३-२४ चा देश पातळीवरील नॅशनल फेडरेशनचा देशातील सर्वोकृष्ठ कारखाना व यावर्षीचा २०२४-२५ चा व्हिएसआयचा सर्वोकृष्ठ कारखाना पुरस्कार मिळाला आहे.
सोमेश्वर साखर कारखान्याची गाळप क्षमता ७५०० टन प्रति दिन असून ३६ मेगा वॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती व ३० किलो लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मिती प्रकल्प आहे. हंगाम २०२४-२५ मध्ये १२,२४,५२४ टन ऊसाचे गाळप केले असून त्यामधुन १४,५६, २०५ क्विंटल साखर उत्पादन केलेले आहे. साखर कारखान्याचा साखरेचा उतारा ११.८९ टक्के इतका राहिलेला आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून ५ कोटी ८८ लाख ४५ हजार ७९८ युनिटची महावितरणला विक्री केलेली आहे.
गाळप क्षमतेचा वापर १११.०३ टक्के विजेचा वापर २९.९४ किलो वॅट प्रति टन ऊसावरती राहिलेला आहे, व बगॅसची बचत ७.२१ टक्के इतकी झालेली आहे. गाळपाचे बंद काळाचे प्रमाण (मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल) ०.०६ टक्के इतके असुन मागील वर्षीच्या तुलनेत गाळप क्षमतेत वाढ ५.०३ टक्के इतकी झालेली आहे. तसेच कारखान्याकडून ऊस उत्पादन वाढीसाठी विशेष मार्गदर्शन, अॅपद्वारे मोजणी आणि नोंदणी कार्यक्रम, कार्यक्षेत्रात खोडवा व्यवस्थापनावर जास्त भर, हुमणी कीड नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न, कृत्रिम बुध्दिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब असे कार्यक्रम राबवण्यात येतात. तसेच दैनंदिन आसवनी उत्पादन क्षमता ३० हजार लिटर प्रतिदिन, आसवनी सरासरी क्षमता वापर ११६.४ टक्के, फर्मेन्टेड वॉशमधील अल्कोहोलचे प्रमाण १२ टक्के व एकुण इथेनॉलचे उत्पादन ३१.७८ लाख लिटर आहे.
