सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शेंडकरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजकुमार जगन्नाथ धुर्वे (वय 55 वर्षे) यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. शुक्रवारी पहाटे त्यांच्यावर करंजे-जोशीवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात चार विवाहित भाऊ, भावजया, पुतणे, पुतणी, चुलते असा मोठा परिवार आहे.
करंजेपूलचे फळविक्रेते अर्जुन धुर्वे व पिंपरी चिंचवडमधील उद्योजक चांगदेव धुर्वे हे त्यांचे बंधू होत.
अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेल्या धुर्वे यांनी पिंपरी चिंचवड येथे वेल्डिंग यंत्र तयार करण्याचा छोटा कारखाना सुरू केला आणि स्वतः अविवाहित राहत आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती घडवून आणली. याशिवाय अनेक गरीब कुटुंबातील तरुणांना शैक्षणिक मदत केली. ते ज्या सोमेश्वर विद्यालयात शिकले त्या विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सलग वीस वर्षे पंधरा ऑगस्टला गणवेश वाटप करण्याची परंपरा पाळली.
पिंपरी चिंचवड येथे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. सामाजिक फाऊंडेशन स्थापन करून गरीब मुलांना शिक्षण देण्याचा त्यांचा संकल्प होता मात्र आजारपणामुळे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले.
...
