Bhor Nagarpalika Election l भोरला १६ हजार ७१६ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार : मतदान केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपालिका निवडणुकीसाठी दि.२ मतदान होत असून शहरातील १० प्रभागांमधून २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना निवडून देण्यासाठी ८ हजार १०० पुरुष ,८ हजार ६१६ महिला मतदार असे एकूण १६ हजार ७१६ नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.दुबार मतदारांची संख्या ३४३ असून मतदार यादीत त्या मतदारांच्या नावापुढे विशिष्ट खूण करण्यात आल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले.
      दुबार मतदारांमध्ये एका उमेदवाराचे नाव आले असून मतदार व्यक्ती वेगवेगळ्या असल्याचा खुलासा
शिंदे यांनी केला आहे.राज्य सरकारमधील प्रमुख  भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने राज्यातील दोन सत्ताधारी पक्ष नगरपालिका निवडणुकीमध्ये विरोधक म्हणून उभे राहिल्याने मोठी रंगत निर्माण झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेससाठी भोरचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार भाजपा नेते संग्राम थोपटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.भोर नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दि.३० तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  दि.१ यांनी जाहीर सभा घेतल्याने भोर नगरपालिका निवडणूकीची उत्सुकता शिगेला लागली आहे. शहरातील २२ मतदान केंद्रावर मतदान पार प्रक्रिया सुरू झाली असून थंडी असतानाही मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे चित्र आहे.निवडणूक कर्तव्यावरील १४० अधिकारी,कर्मचारी नियुक्त असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सज्ज आहे.
To Top