Bhor Nagarpalika Election l २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद : २२ मतदान केंद्रांवर ७६.९९ टक्के मतदान

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपालिका निवडणुकीत १ नगराध्यक्ष व २० नगरसेवकांसाठी २२ केंद्रांवर ७६.९९ टक्के मतदान  शांततेत पार पडले.मतदारांनी थंडी असतानाही सकाळपासूनच गर्दी करीत रांगेत मतदान केले.१६ हजार ६१७ मतदारांपैकी मतदारांनी १२ हजार ८७० मतदान केले अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली. 
         मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ न होता मतदान प्रक्रिया सुरू होती. कार्यकर्त्यांची मतदारांना ने -आन करण्याची लगबग दिवसभर सुरू होती.२२ मतदान केंद्रांपैकी आदर्श व सखी  मतदान केंद्र तयार करण्यात आले होते.तर महिलांसाठी सेल्फी पॉइट,अपंग दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी व्हीलचेअर ठेवण्यात आल्या होत्या.सकाळी रोजगारासाठी बाहेरगावी जाणाऱ्या बहुतांशी मतदारांनी लवकरच मतदान आटोपून घेतले. मतदारांनी मतदान प्रक्रिया पाडली.मात्र जनतेने कौल कोणाच्या बाजूने दिला, कोणाचे उमेदवार किती निवडून येणार या चर्चांना मोठे उधान आले आहे.तर नगरपालिकेवर भाजपा की राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
-----------------------
निकाल लांबणीवर..! कार्यकर्ते-उमेदवारांमध्ये नाराजी
नगरपालिका निवडणूक २ डिसेंबर ला होणार. निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबरला जाहीर करण्यात आला होता.मात्र तो निकाल १९ दिवस लांबणीवर पडल्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते तसेच उमेदवारांमध्ये नारजीचा सूर आहे.निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी तात्काळ निकाल लागला असता तर सर्वांची डोकेदुखी कमी झाली असती असे जनतेतून सांगण्यात आले. 
 
To Top